किहीम – ‘गावचे गावपण टिकवून असलेलं पर्यटनस्थळ…’
शहरातील काँक्रीटच्या जंगलापासून दूर,निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव. मुंबईपासून अवघ्या १०० किमी अंतरावर असलेले किहीम हे पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ.अलिबाग तालुक्यातील या किहिम समुद्रकिनाऱ्याचे विशेष म्हणजे तेथे असलेली शुभ्र पांढरी वाळू आणि अथांग पसरलेला स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा.खांदेरी आणि उंदेरी हे दोन जलदुर्ग या समुद्रकिनाऱ्याच्या शोभेत भर पाडतात.येथे संध्याकाळच्या वेळी समुद्रकिनारी बसून सूर्यास्त बघण्याची मजा म्हणजे आयुष्यात एकदा नक्कीच अनुभवण्यासारखा क्षण.समुद्रामध्ये डुबकी घेणारा केशरी रंगाचा सूर्य जेव्हा दूरवर अस्ताला जात असतो तेव्हा एखादे मडके उपडी घालून ठेवल्यासारखे अद्भुत दृश्य आपल्याला दिसून येते.
किहीम येथे पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स,घोडागाडी,उंटावरून फेरफटका,पॅरासेलिंग असे अनेक मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत.किहीमला येण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे गेट वे ऑफ इंडिया वरून बोटीचा प्रवास.या समुद्रमार्गी प्रवासाने आपला बराच वेळ वाचतो आणि फक्त १-१:३० तासात तासात आपणास मांडवा जेट्टीला पोहोचता येते.मांडवा जेट्टी वरून सदर जलवाहूतुक कंपनीची खाजगी बससेवा असते.या बस मधून आपल्याला अलिबाग पर्यंत प्रवास करता येतो.किहीमला पोहोचण्यासाठी ‘चोंढी’ स्टॉप ला उतरून खाजगी रिक्षा करून आपल्याला किहीम समुद्रकिनारी पोहोचता येते.अलिबाग पासून १२ किमी अंतरावर असलेल्या किहीम गावाने अजूनही गावपण टिकवून ठेवचले आहे.खूप सारी नारळाची झाडे,सुरुची बने,शहाळ्याचे पाणी,ताडगोळे,जैवविविधता आणि बरंच काही……..
तर वाट कसली बघता? पुढच्या वेळेस किहिमलाच याल ना? किहीम समुद्रकिनारी लागूनच आहे ‘हॉटेल सागर दर्शन’. फॅमिली पिकनिक साठी उत्तम पर्याय. जेवणाची व राहण्याची उत्तम सोय.तर खवय्यांनो आमच्या चविष्ट आणि मसालेदार मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर या.